Pune – मार्केट यार्ड मधील हमालांच्या विविध मागण्यांसाठी कामगारांचे एकदिवसीय उपोषण

पुणे : मार्केट यार्ड मधील हमाल भवन येथे हमालांच्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी एकदिवसीय उपोषण केले.

यासंदर्भात कामगारांनी नवीन मागण्या केल्या आहेत यामध्ये
1) करार संपून देखील दुकानातील कामगारांची हमाली वाढ करावी
2) नोंदीत कामगारास चांगल्या प्रतीचे हॉस्पिटल मिळावे
3)  नोंदीत कामगारास esic कामगार राज्य विमा अंतर्गत विमा किंवा  मेडिक्लेम संघटनेने काढून दिला पाहिजे
4) मृत्यू होणाऱ्या कामगारांच्या घरातील लोकांस संघटनेमार्फत छोटीसी  का होईना मदत दिली पाहिजे


अश्या विविध मागण्या यावेळी करण्यात येऊन एकदिवसीय उपोषण मार्केट यार्डमधील हमाल भवन येथे करण्यात आले
यावेळी हमाल  सोमनाथ पानसरे ,हमाल   अशोक कांबळे व मार्केट यार्ड येथील कामगार उपस्थित होते.
हमाल  सोमनाथ पानसरे म्हणाले, मार्केट यार्ड येथील कामगार हा कोरोना व टाळेबंदी मुळे आर्थिक समस्येने ग्रासला आहे. मार्केट यार्ड येथील पदाधिकारी कामगाराकडे लक्ष देत नाहीत कामगार हे  दिवसभर खूप कष्ट करत असतात
मार्केट यार्ड मधील ज्या भाजीपाल्याच्या गाड्या आहेत त्या गाड्या मधून सकाळ पासून माल गाळयामध्ये स्वतःच्या पाठीवर ओजे वाहून ते गाळयात पोचवत असतात कामगारांना खूप कमी पगार आहे मार्केट यार्ड चे पदाधिकारी कामगारांकडे लक्ष देत नाही आधीच कामगार हे आर्थिक समस्येने ग्रासला आहे मार्केट यार्ड च्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडू असे सांगत आहे पण अजून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही आम्ही जर येत्या पंधरा दिवसात पदाधिकाऱ्यांनी जर निर्णय घेतला नाही तर आम्ही परंतु उपोषणाला बसणार आहोत आम्ही ज्या कामगारांच्या मागण्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनात दिलेल्या आहेत डॉ. बाबा आढाव हे फक्त हमाल संघटनेचे अध्यक्ष आहेत पण त्यांचे हमाला कडे लक्ष नाही . असे सोमनाथ पानसरे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: