Saturday, September 5, 2026
Latest NewsLIFESTYLE

पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास येतोय? मग हे करून बघा

पावसाळ्यात सततच्या पावसामुळे ओल्या कपड्यांना सुकविण्याचा प्रश्न अधिक जाणवतो. वातावरण दमट असल्यामुळे दोन तीन दिवस कपडे वाळतच नाहीत. तसेच ओल्या कपड्यांना कुबट वास येण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी काय करायचे?

यासाठी काही टिप्स –  

  • पावसात भिजून आल्यानंतर अनेकजण ओले कपडे मशिनमध्ये टाकतात. असे न करता ओले कपडे आधी पंख्याखाली वाळवून मग मशिनमध्ये टाकावेत. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येणार नाही.
  • कपडे धूताना डिटर्जंट पावडरबरोबर थोडा बेकिंग सोडा वापरल्यास कपड्यांचा कुबट वास तर येतच नाही त्याबरोबर कपडे अधिक स्वच्छ आणि निर्जंतुक होतात.
  • कपडे धुतल्यानंतर ते चांगले पिळा. कपड्यांमध्ये पाणी राहिले तर ते कपडे लवकर वाळत नाहीत.
  • कपडे वाळल्यानंतर वापरण्याआधी इस्त्री करावे. त्यामुळे कपड्यांना येणारा कुबट वास जातो.
  • वाळलेले कपडे बंद कपाटात ठेवणे टाळा व मोकळ््या जागेत ठेवा.
  • वाळलेले कपडे कपाटात ठेवताना कपाटात आधी पेपर टाकावा. पेपरमुळे कपडे कोरडे राहण्यास मदत होते.
  • कपाटात एका कोपऱ्यात मलमलच्या कापडात कपूर बांधून ठेवावेत. त्यामुळे कपड्यानं कुबट वास येत नाही.
  • कडुलिंबाची वळलेली पाने कपाटात ठेवल्यामुळे बुरशीजन्य पसरणारा जंतुसंसर्ग टाळता येतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading