म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसेच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथिल करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जादा आहेत त्या ठिकाणी हॉट स्पॉट घोषित करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. बारामती तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोणत्या वयातील व्यक्ती दगावल्या व त्यापैकी किती व्यक्तींना दुसरे आजार होते याबाबतचा चार्ट वैद्यकीय अधिकारी यांनी तयार करावा असे आदेश ही त्यांनी दिले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. 

नगरसेवक जय पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या ‘हरित बारामती, हरित तांदुळवाडी’ उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तांदुळवाडी येथे वृक्षारोपण करुन करण्यात आला. यावेळी नागपरिषदचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच बारामती दूध संघाच्यावतीने कोरोनाने निधन झालेले कर्मचारी भगवान रामचंद्र दडस व शंकर दगडू खांडेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाखाचे धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. तसेच मॅगनम इंटरप्रायजेस बारामती यांच्याकडून देण्यात आलेल्या मास्क आणि ॲन्टीजन किट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैद्यकीय विभागास सपूर्द करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: