Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – राष्ट्रवादी काँग्रेसला कार्यालयाचे उद्घाटन भोवले, शहराध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाचे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शेकडों कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. कोरोना नियमावली पायदळी तुडवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना महागात पडले आहे.

राष्ट्रवादी शहर कार्यलय उद्घाटन कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पुण्यातील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना ट्रोल करण्यात आले होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात प्रशांत जगताप यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली होती.

ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी माजी महापौर तथा शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके यांच्यासह १००-१५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading