ओबीसी आरक्षण – येत्या 26 जून रोजी पुणे शहरात चक्काजाम आंदोलन – पंकजा मुंडे

पुणे : येत्या 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे  या निमित्ताने भाजप च्या वतीने ओबीसी च्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. याच दिवशी पुण्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्य जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तापकिर, नगरसेवक दत्ता खाडे, योगेश टिळेकर, पुण्यातील ओ. बी. सी. चे कार्यकर्ते व भाजप चे पुण्यातील पदाधीकरी व कार्यकर्ते उपस्थित होते

पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षनासाठी खूप प्रयत्न केले. हे तीन पक्षाचे सरकार यांना आरक्षना संदर्भात काहीही घेणे देणे नाही भारतीय जनता पार्टी चे सगळे कार्यकर्ते चक्का जाम आंदोलन राज्यात करणार आहेत, जो पर्यंत आरक्षन भेटत नाही तोपर्यंत राज्यात निवडणूका होवु देणार नाही असा इशारा पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला. मराठा आरक्षन विषयी सरकार मराठा आंदोलकाची बेठक घेवून आरक्षन सोडवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत तसेच ओ. बी. सी. बेठक घेवून आरक्षन सोडवण्यासाठी प्रयत्न करावे  पुणे शहरातील ओ. बी. सी. च्या नेत्याबरोबर  बेठक झाली सगळ्या नेत्यांची आरक्षन मिळाले पाहिजे अशीच भूमिका आहे ओ. बी. सी.

ना 50 टक्के आरक्षन मिळाले पाहिजे हीच आमची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षन रद्द केल्यावर राज्य सरकारने  सुप्रीम कोर्टात लगेच अपील करायला पाहिजे होते मी आंदोलन झाल्या वर विजय वडेट्टीवार यांनी जे ओ. बी. सी. साठी जे शिबीर ठेवले आहे त्या साठी जाणार आहे असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: