राष्ट्रीय समाज पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा – महादेव जानकर
पुणे : राज्यत सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा तापलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष मराठा आंदोलनाला जाहीर पाठींबा देत असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रविवारी सांगितले.
रासपचे शहर उपाध्यक्ष बालाजी पवार यांच्या वतीने धनकवडी येथे गरजु भाजी विक्रेत्यांना मोफत छत्रीचे वाटप महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जानकर बोलत होते. याप्रसंगी अजित पाटील, विनायक चाकणकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले, रासपचे शहर उपाध्यश बालाजी पवार हे धनकवडी भागातील गरजू लोकांना सातत्याने मदत करत असतात, पवार यांनी टाळेबंदी च्या काळात गरजू लोकांना धान्य ,मास्क मोफत वाटप केले. त्यांनी असेच सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवावे पक्ष त्यांना योग्य संधी देईल.
बालाजी पवार म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखे आहे माझ्या कार्यकर्त्यांची महादेव जानकर यांना एकदा तरी कार्यक्रमाला बोलवा अशी इच्छा होती याचा आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. साहेबांच्या उपस्थिती मुळे भविष्यात अधिक उत्तम काम करण्याची जबाबदारी आमच्यावर आल्याचे आम्ही मानतो.
