Father’s Day – ‘मी मुलांसोबत तुझ्याइतकीच अमेझिंग होऊ शकले असते तर…, असे म्हणत जेनेलियाने रितेशला दिल्या शुभेच्छा

आज फादर्स डे निमित्त अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने पती आणि अभिनेता रितेश देशमुखसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. “हॅपी बाबाज् डे” अशा शब्दात जेनेलियाने रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच रितेश आणि रियान-राहिल यांच्या फोटोशूटचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

जेनेलिया आपल्या पोस्ट मध्ये लिहिते की, ‘मी मुलांसोबत तुझ्याइतकीच निस्वार्थी, संयमी आणि अमेझिंग होऊ शकले असते, तर किती बरं झालं असतं. पण तुला पराभूत करण्याची एकही संधी तू मला देत नाहीस. तू सर्वोत्कृष्ट वडील आहेस. माझ्यासोबत पुरेसा वेळ न घालवल्याबद्दल मी तुझ्याकडून हव्या त्या गोष्टी उकळू शकते. मात्र मुलांनी बाबामधला ‘ब’ जरी उच्चारला, तरी तुझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे असणार हे त्यांना माहीत असतं’. पालकत्वासारख्या जादूई गोष्टीत माझा जोडीदार झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.’

Leave a Reply

%d bloggers like this: