‘भुकेला नाव नसते मंच’मार्फत भटक्या कुत्र्यांना रोजचे जेवण

पुणे – निसर्गात फक्त माणूसच नाही तर हजारो जीव आहेत व त्यांना देखील जगण्याचा आधार मिळत असतो माणूस हा असा समाजातील घटक आहे की तो विविध जीवावर प्रेम करून त्याचा सांभाळ करीत असतो अशाच पद्धतीचा प्रत्यय सचिन शिंदे यांनी ‘भुकेला नाव नसते मंच’मार्फत भटक्या कुत्र्यांना रोजचे जेवण देऊन करून दाखविली आहे. 


सचिन शिंदे हे प्राणिप्रेमी असून गेल्या तीन वर्षांपासून दररोज 50 ते 60 कुत्र्यांना जेवण देण्याचं काम करीत आहेत.  पुण्यातील जांभूळ वाडी ,दत्तनगर ,शनिनगर या भागात भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचं काम ते करीत आहेत.  सचिन शिंदे यांना समाजकार्याची आवड अनेक वर्षांपासून असून यापूर्वी देखील त्यांनी झोपडपट्टी भागातील मुलांसाठी मोफत अभ्यासवर्ग चालविले आहेत त्यातून अनेक मुलांचे चांगले करियर झाले आहे अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. 

कोरोनाची स्थितीत काही काळ बंद असल्याने प्राणी साठी काहीतरी करावे या भावनेतून मोकाट कुत्र्यांना अन्न देण्याचे काम चालू केले असून समाजातून अनेक ठिकाणावरून मदत येत आहे
ही मदत मोकाट कुत्र्यांना अन्न स्वरूपात किंवा काही प्राणिप्रेमी पैसे स्वरूपात देखील मदत करीत आहेत. समाजात तरी कोणाला मदत करावयाची असेल तर भुकेला नाव नसते मंचचे सदस्य अक्षय मदने यांच्या गूगल pay नंबर वर करावे असे आवाहन देखील त्यांनी केले

Google pay number 7775044669

Leave a Reply

%d bloggers like this: