पुणे मनपा प्रशासना विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध; आंबील ओढा नागरी कृती समिती आक्रमक 

पुणे -आंबील ओढा झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात विकासक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांकडून स्थानिकांची दिशाभूल आणि अपारदर्शक काम चालू असल्यामुळे पुणे महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिरण तसेच विकसक प्रताप निकम यांच्या वस्तीच्या दौऱ्यावर आंबील ओढा झोपडपट्टीतील नागरिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवल्याचे बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांनी सांगितले. 

आंबील ओढा झोपडपट्टी हा फायनल प्लॉट क्र 28 हा पुणे मनपाच्या मालकीचा असून अजून तो विकासकास हस्तांतरित नसताना झोपडपट्टी धारकांना वेगळेपणाने घरे खाली करून घ्यायचा प्रताप चालू आहे. प्रशासनाकडून आंबील ओढा वळवण्याचा घाट घालून शेकडो कुटुंबाना बेघर करण्याचे कटकारस्थान इथे रचले जात आहे. आंबील ओढा नागरी कृती समिती च्या माध्यमातून लोकांनी आयुक्त, आणि प्रशासनास घेराव घालून चुकीचे दिशाभूल करणारे काम थांबवा आणि सर्वाना विश्वासात घेऊनच काम करा तसेच विकास करताना कुठेही पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घ्या असे नमूद केले. 

या वेळी प्रशासनाकडून पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, परिमंडळ 5 चे उपायुक्त पुणे मनपा अविनाश संकपाळ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. तसेच कृती समितीच्या माध्यमातून बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे, सिध्दार्थ दिवे, हनुमंत फडके, तानाजी लोहकरे, किरण सोमवंशी, सागर ढावरे, पुरुषोत्तम ओहाळ यांनी झोपडपट्टी धारकांच्या वतीने विषय मांडून प्रशासनास उघडे पाडले.

Leave a Reply

%d bloggers like this: