महामारीच्या काळात ऑनलाईन बँकिंग आणि डिजीटल पेमेंटच्या वापरात वाढ – फआयएसच्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई : कोव्हिड १९ च्या महामारीमुळे भारतात डिजीटल पेमेंटचा अंगीकार वाढला असून भारतीय ग्राहकांपैकी 68% ग्राहक आता त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग अॅप्सचा वापर करीत आहेत. आर्थिक बाबींविषयक क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या एफआयएसच्या (NYSE: FIS) अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार महामारीने लोकांना रोख आणि धनादेश यांच्याऐवजी डिजीटल पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याकडे उद्युक्त केले आहे.

एफआयएस पेसने जून २०२० आणि एप्रिल २०२१ मध्ये भारतीय प्रौढांचे सर्वेक्षण केले. ‘करोना साथीचा ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर काय परिणाम झाला’ याचा अभ्यास केला. यातील महत्वाचे मुद्दे –

  • भारतीय ग्राहकांपैकी 68% ग्राहक आता त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करतात.
  • आता खरेदी, मग पैसे यांसारख्या अॅप्सना चांगली लोकप्रियता लाभत असून ३२% भारतीयांकडे आता बीएनपीएल अॅप आहे.
  • गेल्या १२ महिन्यात ३४% भारतीयांना आर्थिक फसवणुकीचा अनुभव आला आहे. मुख्यत्वे फिशिंग, त्यानंतर क्यूआरकोड/ यूपीआय घोटाळे यांच्याद्वारे फसवणुकीचे प्रकार घडलेले असले तरी कार्ड घोटाळे आणि स्कीमिंग द्वारेही फसवणूक झाली आहे. 
  • एकूण ग्राहकांपैकी ९४ % ग्राहकांकडे स्वतःची मोबाईल वॉलेट आहेत.
  • साथीच्या काळात आधी खरेदीमग पैसे (बीएनपीएल) सारख्या अॅप्सना खूप लोकप्रियता लाभली. विशेषकरून तरुण पिढीमध्ये. सरासरी ३२% ग्राहकांनी बीएनपीएलचे अॅप खरेदी केले आणि बहुतेक वेळेला ग्राहकांनी अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या बीएनपीएलचा पर्याय निवडला. 

एफआयएसच्या एपीएमइएचे चीफ रिस्क ऑफिसर भारत पांचाळ म्हणाले, “महामारीने भारताला डिजीटल पेमेंटच्या नव्या युगाकडे जाण्यासाठी प्रवृत्त केले. यशस्वी होण्यासाठी बँकिंग उद्योगानं तंत्रज्ञान केंद्रित धोरणं राबविणं महत्वाचं आहे. त्यात वेगानं आपल्या सवयी बदलणाऱ्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या पसंतीक्रमांना त्यात स्थान देण्याबरोबरच देशभरातल्या तळागाळातील समाजालाही या आर्थिक व्यवहारात सामावून घेणं गरजेचं ठरतं.”

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: