Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ

अमरावती : राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.  शेतकरीच असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील आज विधिवत पेरणीचा शुभारंभ केला.

राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.नयना कडू यांनी विधिवत बैल तिफण पूजन करून पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरूवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे.अशातच सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणेदेखील उपलब्ध होतील की नाही अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला. मात्र स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भोंगाडे,राहुल म्हाला,संदीप मोहोड,गौरव बोंडे,सतीश मोहोड,मनिष मोहोड,उमेश कपाडे व गोलू ठाकुर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading