कोरोनाशी लढताना सकारात्मकता महत्त्वाची : चंद्रकांत पाटील

पुणे : हळुहळू कोरोनाचा प्रभाव कमी होत तरी सावधानता पाळणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच आपण कोरोनाशी लढणे आणि जनजागृती करणे आवश्यक आहे, असा आशावाद चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

भाजयुमोचे उपाध्यक्ष महेश पवळे यांच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार जनसंवाद रथ” या उपक्रमाचे उद्‌घाटन चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजयुमो अध्यक्ष राघवेंद्र मानकर, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, मंजुश्री खर्डेकर, उद्योजक समीर पाटील, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा कोथरूड अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, संतोष लांडे, शंतनू खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महेश पवळे म्हणाले की, कोरोनाच्या या कठीण काळातून लवकर बाहेर येण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मकता समाजामध्ये यावी अशा व्यापक संकल्पनेतून जनसंवाद रथाचे कर्वेनगर परिसरात आयोजन करण्यात आले आहे. या रथाच्या माध्यमातून सुमारे ४००० घरामध्ये तुळशीचे झाड देत जनजागृती करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: