वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्न धान्य वाटप, अरविंदो मीरा संस्थेचा उपक्रम, अभिनेत्री नयन पवार यांचा पुढाकार

मुंबई, दि.११ – लॉकडाऊन नावाचा पहिला झटका गेल्या वर्षी सर्वांना बसला. ती घोषणा झाली व सर्वच स्तरानर गोंधळ उडाला. कारखाने, कार्यालय, दुकाने, शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. नोकऱ्या गेल्या, लााखो लोकांचा रोजगार बुडाला, लघुउद्योग बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार सुरू झाली. अशा वेळी अरविंदो मीरा या सेवाभावी संस्थेने फारच मोलाचे कार्य केले.

वाशी, दादर परिसरातील गरजूंना किराना सामानाचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला. या संस्थेने तळागाळतील गरीब व गरजू लोकांचा शोध घेतला. त्यात माथाडी कामगारापासून वेगवेगळ्या श्रमजीवी लोकांचा समावेश होता. मात्र यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी मदतीची साद घातली. सकाळी चार वाजल्यापासून वृत्तपत्राची विक्री करणारे, पेपर स्टाँलवर बसणारे तसेच घरोघरी पेपर टाकणारे कामगार यांनाही अरविंदो मीरा संस्थेतर्फे किट वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.

नाट्य, चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र अभिनेत्री नयन पवार यांच्या पुढाकाराने किट वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, खजिनदार धनश्री साखरकर, मंगेश राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, विरेंद्र म्हात्रे, सुनिल तावडे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

Leave a Reply

%d bloggers like this: