‘चेकमेट -२०२१ :दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्यावतीने ‘चेकमेट -२०२१ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन ११,१२ जून रोजी ऑनलाईन करण्यात आले असून ११ जून रोजी सकाळी या कार्यशाळेचे उदघाटन झाले.

व्यवस्थापनशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञानविषयक चर्चा या दोन दिवसीय कार्यशाळेत होत आहे. देश आणि परदेशातून विविध मान्यवर त्यात सहभागी झाले असल्याची माहिती अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्रभारी संचालक डॉ रोशन काझी यांनी दिली. कार्यशाळेचे हे तेरावे वर्ष आहे.’इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी एंड बिझनेस मनेजमेंट’ असा या कार्यशाळेचा विषय आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार हे या कार्यशाळेचे पेट्रन आहेत.

शुक्रवारी टाटा मोटर्सच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप चॅटर्जी,डॉ सईद अझरुद्दीन(औरंगाबाद),डॉ.एचजीएच रजा सुलतान रजा कासीम(मलेशिया) यांनी मार्गदर्शन केले.

डॉ नायला एजाझ (कॅनडा),डॉ उमेश देशपांडे,डॉ.बालमुरलीथर बालकृष्णन (मलेशिया )डॉ मुर्तझा जुनैद फारुख (ओमान ) इत्यादी मान्यवर शनिवारी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: