प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट

मुंबई – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघांमध्ये बऱ्याच वेळेपासून चर्चा सुरू आहे. भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे तसंच ही भेट नेमकं कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही उत्सुकता कायम आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांचा ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या विजयात मोठा वाटा आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार राहणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली. अशात आता शरद पवारांसोबतच्या भेटीचे विविध तर्क लावले जात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र, भाजपला याठिकाणी तीन अंकी आकडाही गाठता आला नाही. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये बहुमतानं विजय मिळवला आहे. यानंतर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकाचा चेहरा म्हणून कोण असणार यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचाही सध्या शोध सुरु आहे. यामध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाणार का? अशाही चर्चा सुरू आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: