Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग

पुणे – शहरातील ब्रिटिश कालीन महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशामन दल घटनास्थळी जाऊन दाखल झाले. मात्र तोपर्यंत आतील काही भाग जळून खाक झाला होता. अग्नीशामन दल्याच्या तीन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली असून नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading