Big News – पुणेकरांना दिलासा मॉल्स, दुकाने रात्री ७ वाजेपर्यंत तर हॉटेल, बार रात्री १० पर्यंत खुले राहणार

पुणे – कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारने पाच स्तर निश्चित केले आहेत. या स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून, पुण्यातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निर्बध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी सोमवारपासून लागू केल्या नियमांची माहिती दिली. नियमावलीचं पालन करून मॉल्स सुरू करण्यास तसेच दुकानंही ४ वाजेऐवजी ७ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: