fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

शरद पवार आणि प्रशांत किशोर  भेटीवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

पुणे -/राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतरही प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विरोधकांकडून २०२४ मध्ये भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “प्रशांत किशोर यांनी मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही”.
शरद पवारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट आहे का ? असं विचारण्यात आलं असता, त्यांनीच आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं आहे म्हणत अजित पवारांना विषयाला पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading