विद्यार्थ्यांची सरसकट परीक्षा फी माफ करावी; NSUI ची मागणी

पुणे – विद्यार्थ्यांची सरसकट परीक्षा फिस माफ करावी आणि वर्ष 2019-20 मधील घेतलेली परीक्षा फीस परत द्यावी यासाठी विद्यार्थी काँग्रेस कडून प्र. कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील फेब्रुवारी – मार्च मध्ये विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने परीक्षा फिस घेतली होती आणि कोविड च्या परिस्थिती मुळे विद्यापीठानि परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले आहे. वरील शैक्षणिक वर्षांचीही परीक्षा फिस विद्यापीठाकडे आहे. विद्यापीठाने ही परीक्षा फीस विद्यार्थ्यांना परत करावी.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष  भूषण राणभरे, विक्रम धर्मावत उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस प्रवक्ता अविनाश सोळुंके, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस प्रवक्ता निकिता बहिरट, पुणे शहर विद्यार्थी काँग्रेस सचिव परमेश्वर अंडील आणि धनंजय कोकणे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: