Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

वंचितांचे लसीकरण आणि रिक्षाचालकांना मोफत सीएनजीचे वाटप

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस कोथरूडकरांसाठी आप’लसं’ करणारा ठरला. वाढदिवसानिमित्त त्यांनी १३०० वंचितांचे लसीकरणाची व्यवस्था केली. तर २००० रिक्षाचालकांना मोफत सीएनजीचे वाटप केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांनाच फटका बसला. मात्र, त्यातही आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना याची सर्वाधिक झळ सहन करावी लागली. यापैकी काहींना पुन्हा आपल्य पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून, रिक्षाचालकांना मदतीचा एक हात दिला. त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र, समाजातील काही घटकांचे जलद लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत लसीकरण करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आज दोन्ही उपक्रम राबविले जात आहेत.”

यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे, शहर सरचिटणीस दीपक पोटे, गणेश घोष, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, लसीकरण केंद्रावर कोथरूड मंडल महिला मोर्चाच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचे औक्षण करुन, त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका हर्षाली माथवड, वृषाली चौधरी, माधुरी सहस्रबुद्धे, कोथरूड मंडलाचे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, पल्लवी गाडगीळ, सुरेखा जगताप, शितल गुंड, गायत्री काळभोर, केतकी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading