Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

इंडो-आयरिश बायोटेक  स्टार्टअपला  ‘सायजेनिका’ने मिळविला एसओएसव्ही कडून निधी

पुणे : एसओएसव्ही (SOSV) या व्हेंचर कॅपिटल (साहसवित्त) संस्थेच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांकडून १४ लाख अमेरिकन डॉलर चा निधी मिळाल्याची घोषणा पुण्यात मुख्य कार्यालय असलेली सायजेनिकाने केली आहे. निधी मिळविण्याच्या या पहिल्या फेरीत मिळालेली रक्कम सायजेनिकाच्या पेशींमधील औषध वितरणाच्या सुरक्षित आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाला मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल.

साय जेनिका चे हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जिवंत पेशींना इजा न करता किंवा त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण न करता त्यांच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. आत्ताचा हा १४ लाख डॉलर चा बीज निधी एसओएसव्ही या व्हेंचर कॅपिटल संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात आला आहे.  व्हॉयेजर हेल्थ-टेक फंडव्हॉएजर्स.आयओ चे संस्थापक डेव्हिड रोवन आणि एंजल गुंतवणूकदार शराफ यामानी आणि सामी मिकाती हे इतर गुंतवणूकदार या निधीत सहभागी आहेत. या तंत्रज्ञानाच्या बळावर साय जेनिका जैव औषध निर्मिती कंपन्यांची कर्करोग आणि दुर्मिळ व्याधींवर उपचार करण्यासाठीची औषधें विकसित करण्याच्या आणि रुग्णाचे जगणे सुसह्य करण्याच्या प्रक्रियेतील भागीदार होऊ शकेल.

या निधी विषयी साय जेनिका च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नुसरत संघमित्रा म्हणाल्या, पेशींना इजा न करता किंवा त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण न करता कर्करोगावरील किंवा इतर जनुकीय औषधोपचार करण्यासाठी औषध निर्माण करणे हे औषधनिर्मिती उद्योगापुढील एक मोठे आव्हान आहे.  आमचे हे पूर्णपणे नवे तंत्रज्ञान म्हणजे कोणत्याही संगणकावर वापरता येणा-या यूएसबी ड्राइव्ह सारखे आहे. यामुळे औषधोपचारांच्या प्रक्रियेत क्रांती घडेल आणि रुग्णाच्या प्रतिसादात मोठा फरक पडेल.

एसओएसव्ही चे भागीदार बिल लिआओ म्हणाले, साय जेनिका ने जैवतंत्रज्ञानाच्या वाटचालीतील एक अत्यंत गंभीर अडचण दूर केली आहे.  या क्रांतीतील हिस्सा असल्याचा आम्हाला आनंद आहे.

व्हॉयेजर्स डॉट आयओ चे संस्थापक डेव्हिड रोवन म्हणालेजीवन पालटून टाकेल असे तंत्रज्ञान आरोग्याच्या क्षेत्रात विकसित करणे ही आता बड्या आयुर्विज्ञान संस्थांची मक्तेदारी राहिलेली नाही. ओदिसा मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने कर्करोगाने ग्रस्त व्यक्तींवर सर्वसाधारणपणे आढळणारे साइड इफेक्ट न होता नेमकेपणाने औषधोपचार करण्याची प्रक्रिया आमूलाग्र बदलून टाकेलं असे तंत्रज्ञान  विकसित करण्याची क्षमता दाखवली आहे. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading