2400 रुपयांच्या दारूपायी पावणे तीन लाखाचा गंडा

पुणे – कोरोनामुळे सर्वत्र  लॉकडाऊन आहे.  मात्र या काळा मध्ये ऑनलाइन दारू सेवा सुरू होती. याचा फायदा अनेकांना  ऑनलाइन गंडा लावण्याचे काम केले जात आहे.  अशातच पिंपरी –  चिंचवडमधील एका तळीरामाला ऑनलाइन दारू मागवण्याची चांगलाच फटका बसला आहे.  चक्क  2400 रुपयांची दारू या महाशयांना   पावणे तीन लाखांला पडली

गुगलवरून या तळीरामाने एका वाईन शॉपचा नंबर मिळविला, त्या नंबरवर संपर्क साधला. चोविशे रुपयांची ऑर्डर दिली, समोरून मोबाईलवर क्यूआर कोड आला आणि इथंच हा तळीराम फसला. बघता-बघता आरोपीने खात्यातून पावणे तीन लाख रुपये लुटले. तर दुसऱ्या प्रकारात  एका तळीरामाला अठराशे रूपयांच्या दारूची एक लाख रुपये मोजावे लागले.  क्यूआर कोड, लिंक, ओटीपी आणि अँपद्वारे परराज्यातील या भामट्यांनी अनेकांना लुबाडले आहे. अशी माहिती
संजय तुंगार  ( पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम ) यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: