रिक्षाचालकांसह कष्टकरी जनतेला तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

पुणे – रिक्षा चालक ,फेरीवाले, घरेलू कामगार ,सह कष्टकरी जनतेला कोविड काळात तीन हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड मनपा सभाग्रहात मंजूर करण्यात आला ,परंतु त्याबाबत मनपा आयुक्त यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे अभिप्राय सहमती मागितली आहे विभागीय आयुक्तांनी अजून मंजुरी दिली नाही यामुळे गोरगरीब कष्टकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब होत आहे ,

तसेच रिक्षा चालक मालकांना हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्या वसुलीचा तगादा लावत आहेत तसेच गुंडा मार्फत रिक्षा ओढून नेल्या जात आहेत त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थित विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना फायनान्स कंपनीची बैठक घ्यावी व रिक्षाचालकांचा हा विषय सोडवावा असे अजित दादा पवार यांनी बैठकीत सूचना दिल्या होत्या ,
या बरोबरच रिक्षा चालक फेरीवाले घरकाम महिला यांच्या इतर विविध प्रश्न प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नांबाबत लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय रिक्षाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे , या प्रश्नावर तिव्र आंदोलन करणार असल्याचे या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले

यावेळी रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे तसेच मरिप शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख धनंजय कुदळे ,विजय ढगारे ,संजय दौंडकर ,जाफर भाई शेख ,रवींद्र लंके ,अजय साळवे ,तुषार लोंढे, अनिल शिरसाट ,राहुल मस्के, निखिल येवले ,तुकाराम तात्या देवरे, प्रदीप आहेर ,अविनाश जोगदंड ,खलील मकानदार, दीपक कुसाळकर ,अविनाश गोरोबा जोगदंड आदी उपस्थित होते,

Leave a Reply

%d bloggers like this: