आरक्षणासाठी पवारांच्या पाठीशी उभे राहू; संभाजीराजे तर आमचे राजे आहेत -चंद्रकांत पाटील

पुणे – भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे त्याचे स्वागत आहे, जे कोणी मराठा आरक्षण आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील हे आम्ही आधीच सांगितले आहे. उद्या शरद पवार यांनी आंदोलन केलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, संभाजीराजे तर आमचे राजे, नेते आहेत त्यामुळे या प्रश्नांच्या सोडविण्यासाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना पाटील म्हणाले, संभाजीराजांच्या घोषणेची आम्ही स्वागत करत आहोत, मराठा आरक्षण आणि कोणी आंदोलन करत असेल तर भाजप स्वतः झेंडा न घेता या आंदोलनात यांनी आधीच स्पष्ट केले आहे. संभाजीराजांना आमचे काही सहकार्य हवे असेल तर मी त्यांना मदत करू, आम्ही आंदोलनात आलो तर राजकीय रंग लावू शकतो आमच्या नसला तरी आमच्या आयडेंटिटी आहे त्यामुळे आमच्या सरकार असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. आम्हाला आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी टीका केली पण सत्य हे आहे की, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केस नीट चालवली नाही असे मराठा समाज म्हणत आहे. आरक्षणा रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा असे सांगतात. पण अजून कोणताही निर्णय का घेतला नाही? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: