इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

पुणे – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसने आज (सोमवारी, ७ जून २०२१ रोजी) आंदोलन केलं. काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल दरवाढ रद्द करण्यासंदर्भातही जोरदार घोषणाबाजी बराच वेळ सुरू होती.काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशींसहीत अनेक काँग्रेस पदाधिकारी पेट्रोल पंपासमोर घोडागाडीमध्ये बसून घोषणा देत होते.पेट्रोल-डिझेल शंभरपार, बस्स करा लूटमार असा बॅनर पकडून काँग्रेसच्या महिल्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपासमोर निर्दर्शनं केली.नगरसेवक रवींद्र धंगेकर मनोज तिवारी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: