भाजपामध्ये अव्यवस्था नाही तिकडे गेल्यावर तरी खरे बोलावे चंद्रकांत पाटलांचा नाथाभाऊना टोला

पुणे – राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेयांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, असा टोला लगावतानाच भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी  पुण्यातपत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक
  आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला. संजय राऊतांच नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता? असा सवाल करतानाच राऊतांनी 80 जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी 80 नव्हे 280 जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.यावेळी त्यांनी अनलॉकच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. वारंवार टीकेचा स्वभावही नाही अन मुद्दाही नाही. पण ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: