Pune – सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह 17 मजूरांचा होरपळून मृत्यू

पुणे – जिल्ह्यातील उरवडे (ता. मुळशी) येथे एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत 41 मजूर अडकून पडले होते. यापैकी 17 जणांचे मृतदेह सापडले असून यामध्ये 15 महिलांचा समावेश आहे. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.

अग्निशामक दलाच्या 9 गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी लागलीच धाव घेतली आहे.

पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामास येत असतात. अशा परिस्थितीत उरवडे स्थित एस. व्ही. एस. अक्वॉ कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे 20 हुन अधिक मजूर अडकून पडले आहेत अशी प्राथमिक माहिती होती. 15 जणांचे मृतदेह सापडले आहेत. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: