Good News -18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार

नवी दिल्ली : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येईल तसेच लासिकरणाची राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असेल, अशी महत्वपूर्ण घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी केली. पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधत ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येत्या 21 जूनपासून मोफत लासिकरणाला सुरूवात होणार आहे.

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लशींची वाढती मागणी यामुळे राज्यावर लासिकरणाचा ताण येवू लागला आहे. यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये पैसे देऊन लस विकत घेता येईल. लसीची जी किंमत आहे, त्यावर 150 सर्व्हिस चार्ज खासगी रुग्णालय घेऊ शकतात, असेही मोदींनी स्पष्ट केले .

गरजूंना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य

कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा केली होती. हीच सुविधा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही कायम राहणार आहे. मे आणि जूनमध्ये ही योजना सुरू राहणार असून पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे. 80 कोटीहून अधिक नागरिकांना आतापर्यंत मोफत धान्य देण्यात आलं आहे. ही सुविधा यापुढेही नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आता PM गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानातून मोफत धान्य घेऊ शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: