प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीभारतातील पहिले स्वच्छ प्लास्टिक वर्गीकरण व संकलन केंद्र

मुंबई : भारतात प्लास्टिक प्रदूषण हे मोठे आव्हान आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळच्या अहवालानुसार देशात २०१९-२०२० या वर्षात २६,००० टन प्लास्टिक कचरा गोळा झाला, यापैकी केवळ ६० टक्के रिसायकल करता येण्याजोगे प्लास्टिक होते. उर्वरित ४० टक्के प्लास्टिक भरावक्षेत्रांत टाकले गेले किंवा तलाव अथवा जलाशयांमध्ये प्रदूषक म्हणून सोडले गेले. याचे एकच कारण म्हणजे घाणेरड्या अवस्थेत विल्हेवाट लावलेले प्लास्टिक रिसायकलिंगसाठी उचलले जात नाही आणि ते आजूबाजूला पडून राहते. या जागतिक पर्यावरण दिनी, बिस्लेरी  या भारतातील बाटलीबंद पाण्याच्या ब्रॅण्डने मुंबईतील मरोळ येथे भारतातील पहिले स्वच्छ प्लास्टिक वर्गीकरण व संकलन केंद्र सुरू केले आहे. बिस्लेरी शोकेस सेंटर हा कंपनीच्या ‘बॉटल्‍स फॉर चेंज’  या २०१७ मध्ये सुरू झालेल्या कार्यक्रमाचा भाग आहे आणि ग्राहकांमध्ये प्लास्टिक प्रदूषण तसेच प्लास्टिक कचरा विल्हेवाटीच्या योग्य पद्धती यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या केंद्रापुढे आहे. बिस्लेरीने स्थापनेपासून ६,५०० टनांहून अधिक प्लास्टिक रिसायकल केले आहे.

बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्केटिंग व अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाच्या संचालक श्रीमती अंजना घोष  म्हणाल्या,  “पुढील काही वर्षांत १०,००० मेट्रिक टन प्लास्टिक रिसायकल करण्याचे व त्याही पुढे जाण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आम्ही मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात आम्ही गृहनिर्माण संस्था, कंपन्या व शाळांमध्ये शैक्षणिक कार्यशाळांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहोत. पर्यावरणातील प्रदूषण केवळ प्लास्टिकमुळे आहे हा सर्वदूर पसरलेला समज दूर करण्याचाही प्रयत्न आम्ही करत आहोत. मुळात प्लास्टिक हानीकारक नाही, तर त्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती घातक ठरत आहेत, हे जनतेला पटवून देण्याचे उद्दिष्टही आमच्यापुढे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: