शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तारकेश्वर टेकडीवर वृक्षारोपण

पुणे – जागतिक पर्यावरण दिन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त येरवडा येथील तारकेश्वर मंदिर परिसरातील टेकडीवर खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी समस्त गावकरी मंडळ तारकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. येरवडा येथील क पर्यटन स्थळाचा दर्जा असणाऱ्या तारकेश्वर देवस्थान टेकडी परिसरात पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन खासदार चव्हाण यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी आमदार सुनील टिंगरे, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड. नानासाहेब नलावडे, पुणे शहर युवती काँग्रेसचे अध्यक्ष अश्विनी परेरा, माजी नगरसेवक शिवाजी क्षीरसागर, नारायण गलांडे, रवी परदेशी,मनोज पाचपुते,शैलेश राजगुरु,निखिल बटवाल, स्वप्नील गिरमकर राष्ट्रवादीच्या वडगावशेरी युवती अध्यक्षा रेणुका चलवादी, मंदाकिनी चांदेरे, अलका ढगे, फाईम शेख, विक्रम निकम यांच्यासह विल्सन चंदेवळ, समीर शेख, जनार्दन कुसाळे,तौसिफ कुरेशी, अक्षय शेलार, राहुल पवार, शैलेंद्र शिंदे, संकेत ढगे, धनंजय बाराते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर युवती उपाध्यक्ष अक्षता राजगुरु यांनी केले.तारकेश्वर मंदिर देवस्थान परिसराची यावेळी खासदार चव्हाण यांनी पाहणी केली. या देवस्थानाला पर्यटन स्थळ म्हणून क दर्जा असून, या ठिकाणी आगामी काळात पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या ठिकाणी सोलर एनर्जी डेव्हलपमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऑक्सीजन पार्क असे अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन यावेळी खासदार चव्हाण यांनी दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: