बार्शी – पोलिसांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान

बार्शी – राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे, केंद्रीय उद्योग मंत्री सदस्य भारत सरकार, अल्ताफ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश ढगे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नागेश कदम, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष विकास औताडे, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष राहुल गाढवे, आसू गावचे उपसरपंच अमोल जगताप, आसू.ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे, जिल्हा अध्यक्ष अजिनाथ राऊत, शिवाजी झोबाडे, कृषी अधिकारी किशोर गणगे, उस्मानाबाद संपर्क प्रमुख विनायक होरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महासचिव रमेश यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र मध्ये आज आजपर्यंत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे संघटना पुरवण्याच्या या मार्गाच्या परिस्थितीमध्ये सफाई कामगार पोलीस अधिकारी असतील आरोग्य अधिकारी असतील अनेक जनतेला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: