Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

भीम आर्मी एकता मिशन यांच्या वतीने पत्रकार गिरीश कुबेर यांच्या कार्यालयासमोर निदर्शने

पुणे – भीम आर्मी एकता मिशन यांच्या वतीने लोकसत्ता चे संपादक व लेखक गिरीश कुबेर पुणे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ,गिरीश कुबेर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध केला . गिरीश कुबेर यांनी संभाजी महाराज यांच्यावर नुकतेच पुस्तक प्रकाशित केले आहे, या पुस्तकांमध्ये इतिहासाचे विकृत लिखाण करून संभाजी महाराजांची बदनामी केली आहे व त्यांच्या बद्दल आक्षेपार्य लिखाण केले आहे. 

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो वारसाहक्काचा प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला महाराणी सोयराबाई ठार मारले छत्रपती संभाजी महाराज धाडशी असले तरी आणि मुत्सद्दीपणा कमतरता होती याशिवाय बाजीराव पेशवे यांची तुलना छत्रपती महाराजांचा सोबत केली आहे अशा ईतिहासाचा कुठलाही संदर्भ नसताना लिखाण करून जाणीवपूर्वक समाज प्रदूषित करण्याचे काम करीत आहे गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करावा राज्य सरकारने या पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी आणावी या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने त्यांच्या पुणे येथील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आले यावेळी भीम आर्मी ऐकता मिशन चे दत्ता पोळ,नीता अडसुळे ,मुकेश गायकवाड, प्रदीप कांबळे गौतम पोटे,अक्षता परदेशी, संध्या वाघमारे, रेहना शेख ,जयवंत पोळ,अलोखं भिंगारदिवे,भारत शिंदे उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading