Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

मनसेकडून पुणेकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवगर्जना प्रतिष्ठान पुणे व  पुणे लोकमान्य फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने  पुणेकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण  पुण्यातील प्रसिद्ध डॉ.शशांक शहा, डॉ.प्रसाद राजहंस, डॉ.कौस्तुभ शेंडकर, डॉ.राजेश टिळेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
     यावेळी पक्षाचे अ‍ॅड गणेश सातपुते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, शहराध्यक्ष वसंत मोरे, महीला अध्यक्ष रुपाली पाटील, शहरउपाध्यक्ष  जयराज लांडगे, आशिष देवधर तसेच गणेश भोकरे, राकेश क्षीरसागर, अजय राजवाडे, तसेच यावेळी पक्षाचे शहर आणि प्रभागातील पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. प्रभागातील नागरिक देखील या सोहळ्यास उपस्थित होते.
या प्रसंगी अ‍ॅड गणेश सातपुते म्हणाले की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे ध्येय मनात ठेवून कोरोनाच्या या महामारीच्या काळात गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका ही पुणेकरांसाठी  संजीवनी ठरणार आहे.
सदरील रुग्णवाहिका अ‍ॅड गणेश सातपुते यांच्या प्रयत्नातून त्यांनी पुणेकरांना उपलब्ध करून दिली असून ही रुग्णवाहिका पुणेकरांसाठी मोफत असणार आहे. कोणालाही वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका लागल्यास 9028823369 या संपर्क करावयाचा आहे. अशी माहिती ऍड गणेश सातपुते यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाले यांनी केले. तर अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading