वाढदिवसा निमित्त 1001 गरजू कुटंबाना मोफत धान्य वाटप
पुणे – कोरोना आणि टाळेबंदी मुळे खूप लोकाचे रोजगार बुडाले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष
भिमराव साठे याच्या वाढदिवस निमित्त अप्पर डेपो, सरमग चाळ, पवन नगर भागात रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
वाढदिवस निमित्त एक छोटासा सत्कार कार्यक्रम आयोजित केला गेला, त्या कार्यक्रमास शहराध्यक्ष जगदीश मुळीक पक्षाचे पदाधिकारि व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी जगदीश मुळीक याचा वर्षाताई भिमराव साठे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जगदीश मुळीक यांनी भिमराव साठे याच्या कामाचे कौतुक केले भिमराव साठे हे समाजसेवेचे काम करत आहेत .जगदीश मुळीक यांच्या हस्ते रिक्षाचालक , विधवा महिला, घरेलू कामगार यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.
