Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

Good News मॉन्सून अंदमानात दाखल

पुणे – नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज ( शुक्रवारी ) अंदमान बेटांवर दाखल झाले आहेत. मॉन्सूनने संपुर्ण दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची गती वाढणार असून, रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी प्रगती होणार आहे.

नैर्ऋत्येकडून येणारे वारे, ढगांची झालेली दाटी, पावसाची हजेरी यामुळे बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट करण्यात आले. बंगालच्या उपसागरात उद्या (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होऊन ही प्रणाली ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत आहेत.

या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन रविवारपर्यंत (ता.२३) मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार आहे. संपुर्ण अंदमान, निकोबार बेटांचा भाग व्यापून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार अंदमान निकोबार बेटांवर साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो असतो. अरबी समुद्रातील “ताऊते” चक्रीवादळामुळे वारे प्रभावित झाल्याने यंदा मॉन्सून एक दिवस उशीराने अंदमानात दाखल झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading