Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

म्युकरमायकॉसिसबद्दल जनजागृती साठी यु ट्यूब चॅनल

डेंटल सायन्स विद्यार्थिनीचा उपक्रम

पुणे : कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढणाऱ्या म्युकर मायकॉसिस या जीवघेण्या बुरशीजन्य आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी धृती गार्डे या डेंटल सायन्सच्या विद्यार्थिनीने यु ट्यूब चॅनल सुरु केले आहे.धृती गार्डे ही भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजच्या बॅचलर ऑफ डेंटल सायन्स(बीडीएस) या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. म्युकर मायकॉसिसची लक्षणे,उपचार,घ्यावयाची काळजी,काही गैर समजुती याविषयी जनजागृती करणारे व्हिडीओ या यु ट्यूब चॅनेलवर अपलोड केले जात आहेत. ‘शैक्षणिक आणि सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने हा उपक्रम करण्यात येत आहे,मुख कर्करोग,तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी देखील सोप्या भाषेत माहिती देण्यात येत आहे’,असे धृती गार्डे हिने सांगितले. https://www.youtube.com/watch?v=14_TjQp87FE या लिंकद्वारे या चॅनेल वरील व्हिडीओ पाहता येतील .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading