Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

समाजभावनेतून गरजूंना सदैव मदतीचा हात द्यावा – रेणुताई गावस्कर

पुणे : परिस्थिती विलक्षण आहेकाळ मोठा कठीण आला आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून इतरांना आवर्जून मदतीचा हात दिला पाहिजेकितीही कठीण काळ आला तरी कामावरील निष्ठा हरविता कामा नयेअसे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविकाएकलव्य न्यासाच्या प्रमुख रेणुताई गावस्कर यांनी केले.

आम्ही एकपात्री महाराष्ट्र आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंत आणि पडद्यामागील तंत्रज्ञांना आज जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी गावस्कर बोलत होत्या. आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे विश्वस्त वंदन राम नगरकरमराठवाडा मित्र मंडळाचे उपप्राचार्य प्रा. रमेश पंडितसंवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजनआम्ही एकपात्री महाराष्ट्रचे अध्यक्ष मारुती यादवविश्वस्त अनुपमा खरेयुवा संगीतकार सन्मित वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘शांताबाई’ फेम संजय लोंढेगायक प्रदीप कांबळे यांच्यासह कलावंत-तंत्रज्ञांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावस्कर यांच्या एकलव्य न्यास या संस्थेलाही साहित्याचे वाटप करण्यात आले.

गावस्कर म्हणाल्यासध्याच्या परिस्थितीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. प्रत्येकाने समाजाप्रती जाणिव जागृत ठेवली तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

प्रा. रमेश पंडित म्हणालेविद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत असतानाच भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मित्र मंडळ अडचणीतीलगरजू लोकांना मदतीचा हात देत आली आहे. समाजकार्याद्वारे मदतीचा हात देऊन विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

सुनील महाजन म्हणालेकोरोनामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून कलावंत-तंत्रज्ञांना उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजभावनेतून मदतीचा हात देण्यात येत आहे.

संजय लोंढे म्हणालेसध्याच्या परिस्थितीत लोककलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. छोटीशी मदत सुद्धा उपजीविकेसाठी मोलाची ठरू शकते.

संस्थेचे अध्यक्ष मारुती यादव यांनी उपक्रमामागील भूमिका विषद केली. वंदन राम नगरकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. आभार अनुपमा खरे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading