‘फॅन्ड्री’फेम शालूच्या हॉट व्हिडिओची चर्चा, नेटकऱ्यानी केले ट्रोल – पहा Video
फँड्रीतील शालू आठवते ना? जिच्या साध्या, सोजवळ रूपानं जब्यासह अनेक तरुणांना वेड लावलं होतं. त्याच शालूची म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिची मागील काही दिवसांपासून सध्या सोशल मीडियावर हवा आहे. अलीकडे तीच्या नवीन लुकची खुप चर्चा असून नेटकरी ही तिच्यावर लाईक्स व कमेंट्स चा वर्षाव करत असतात. मात्र, नुकताच तिने 90s च्या एका गाण्यावरचा हॉट व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे. तिचा हा हॉट अंदाज नेटकऱ्यांना फारसा भावलेला नाही. एकाने तर तिची तुलना डायरेक्ट ‘ फडणवीस मामीं’शी केली असून अनेकांनी निगेटिव्ह कमेंट्स करत तीला ट्रोल केलं आहे.
