Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘राष्ट्रवादीची इच्छा नव्हती म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला’ – चंद्रकांत पाटील

मुंबई –  मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा होती, त्यामुळं त्यांनी अरक्षणाचा मुडदा पाडला, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केली. भाजपने मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी एक समिती स्थापन केली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना, यापुढं मराठा समाजाच्या कोणत्याही आंदोलनात भाजप पक्षीय ओळखीशिवाय सहभागी असेल, असं पाटील यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयानंतर भाजपनं या मु्द्दायवरून आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी भाजपनं राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक घेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणविषयक समिती स्थापन केली. या बैठकीला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार आशिष शेलार शिवसंग्राम चे विनायक मेटे, विक्रम पाटील, श्रीकांत भारतीय यांचीही उपस्थिती होती.

कायदेतज्ज्ञांची समिती नेमून निकालपत्राच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार कसं कमी पडले हे उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाटील म्हणाले. तसंच आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यात भाजपा पक्षीय ओळखीशिवाय सहभागी असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. सर्वोच्च न्यायालयान मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या 600 पानी निकालपत्रात महाविकास आघाडीने मराठा समाजाची केलेली फसवणूक उघड झाली आहे. कालांतराने मराठा समाजातील प्रक्षोभ शांत होईल असं सरकारला वाटत असेल, पण मराठा समाज शांत होणार नाही कारण प्रश्न आयुष्याचा आहे, असंही पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रत्यक्षात टिकणारं आरक्षण मिळवून दिलं होतं. पण मराठा समाजाल आरक्षण मिळावं असं राष्ट्रवादीला वाटतं नव्हतं, त्यामुळं त्यांनी आरक्षणाचा मुडदा पाडला असा आरोप पाटील यांनी केला. सर्वोच्च्च न्यायालयानं वारंवार वेळ देऊनही सरकार पुरे पडलं नाही त्यामुळं अखेर सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading