Saturday, June 20, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप भारतात दाखल

हैदराबाद – कोरोना लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. कोविड लसीकरण मोहिमेमध्ये हातभार लावण्यासाठी ‘स्पुटनिक व्ही’ ही भारतात वापरली जाणारी पहिली परदेशी निर्मित लस बनली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसची पहिली खेप १ मे २०२१ रोजी भारतात आली होती. आता रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ ची दुसरी खेप आज रविवार १६ मे रोजी हैदराबाद येथे आली.

लवकरच देशात ‘स्पुटनिक व्ही ‘च्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. देशात सद्या मंद गतीने लसीकरण सुरु आहे. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लसींच लसीकरण सुरु आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माहितीनुसार ‘स्पुटनिक व्ही’ या आयात लसीच्या एक डोसची किंमत ९४८ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी म्हणजे ९९५ रुपये ४० पैसे असेल. यामध्ये लस टोचून घेण्याच्या किंमतीचा समावेश नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading