Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – उद्या कोरोना लसीकरण बंद

पुणे – महापालिकेकडे कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस संपले असून, शासनाकडून नव्याने लस पुरवठा करण्यात आलेला नसल्याने उद्या (सोमवारी) शहरातील सर्व लसीकरण मोहीम बंद असणार आहे.

गेल्या आठवड्यात महापालिकेला शासनाकडून मिळालेले कोव्हीशील्ड लसीचे 28 हजार डोस शुक्रवारीच संपले आहेत. तर 3 हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याने त्याचे शनिवारी आणि रविवारी नियोजन केले आहे. ही लस आज संपली आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन जाहीर केले जाईल, असे महापालिकेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading