Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – रविवारी राज्यात ३४ हजार ३८९ नवीन रुग्ण; ९७४ जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात मागील २४ तासांत राज्यात ३४ हजार ३८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८१ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.७४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ९७४ मृत्यूंपैकी ४१५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३०६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३०६ मृत्यू, नागपूर-८०, पुणे-४९, कोल्हापूर-३४, सोलापूर-३०, नांदेड-१६, जळगाव-११, पालघर-११, बीड-१०, ठाणे-८, परभणी-७, सांगली-७, गडचिरोली-६, नाशिक-६, अहमदनगर-५, चंद्रपूर-५, रायगड-५, यवतमाळ-५, लातूर-४, सिंधुदुर्ग-३, जालना-२ आणि वाशिम-२ असे आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ११ लाख ३ हजार ९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३ लाख ७८ हजार ४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ लाख ९१ हजार ९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे कोरोना अपडेट
१६ मे – रविवार

  • दिवसभरात १३१७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात २९८५ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ४७ रुग्णांचा मृत्यू. २६ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १४१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५९३०३.
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०५८९.
  • एकूण मृत्यू -७७०६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३१००८.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११५५३.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading