धनी अँप कडून २५ लाख कुटुंबांसाठी मोफत कोविड केअर औषधाचे वितरण
पुणे – धनी ह्या इंडियाबुल्स द्वारे आरोग्य सेवेच्या डिजिटल अँप ने रु. ९० कोटी किंमतीची २५ लाख फ्री कोविड हेल्थ केअर किटचे वितरण सुरु केले आहे , यामुळे ५० लाख लोकांना याचा फायदा होईल . प्रत्येक कोविड हेल्थ केअर किट मध्ये २ व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक औषधे आहेत. हे किट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या शिफारसी द्वारे तयार केले गेले आहेत . हे किट कोविड १९ च्या प्रारंभिक प्रतिबंधात्मक काळजीसाठी उपयुक्त ठरेल. या किट मध्ये औषधांचे मासिक कोर्स असतो जो ताप किंवा शारीरिक वेदना झाल्यावर व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन डी ३,झिंक आणि प्यारासिटामोल या द्वारे एखाद्याची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो .
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजू कुटुंबे धनी अँप वर जाऊन किंवा pharmacy .dhani .com वर लॉग इन करून आपले नि :शुल्क उपचार सुरु करू शकतात . याशिवाय धनी डॉक्टर आणि तज्ञ यांच्या सह विनामूल्य व्हिडियो कॉल करू शकतात , आणि १५ सेकंदात व्हिडीओ कॉल द्वारे डॉक्टरांच्या संपर्कात राहू शकतात .
धनी हेल्थ केअर चे अध्यक्ष निखिल चारी म्हणतात कि ” ह्या किट चा वापर रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करेल आणि जर एखाद्याला ताप , खोकला किंवा घश्याच्या सारख्या लक्षणांचा विकास झाला तर त्वरित कोविडची प्राथमिक काळजी म्हणून औषधांचा वापर सुरु होऊ शकेन , तसेच या उपक्रमामध्ये कुटुंबातील व्यक्ती डॉक्टरांबरोबर सल्लामसलत व योग्य मार्गदर्शन घेऊ शकतात.
धनी हेल्थ केअर च्या चीफ मेडिकल ऑफीसर स्मिता दाश म्हणतात की हे किट कोविड च्या प्रतिबंधात्मक संरक्षणास मदत करेल आणि सर्व वायरल इन्फेक्शन विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल.
या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी धनी यांनी डॉक्टर्स अँप वर डॉक्टरांची पॅनेल बनवली आहे जी २४ तास डॉक्टरांबरोबर सल्लामसलत करण्यासाठी उपलब्ध राहील.
