Saturday, June 20, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

‘मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोरोनाच्या लसीवरुन राजधानी दिल्लीत पोस्टर लावण्यात आले आहेत. यामुळे २५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांढी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल करत मलाही अटक करा असे आव्हान मोदी सरकारला दिले आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत मोदींवर निशाणा साधला आहे. या पोस्टरमध्ये “मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” असा मजकूर आहे. तर राहुल गांधी यांनी आपला प्रोफाईल फोटोवरही पोस्टर ठेवलं आहे. कोरोनाच्या लसीवरुन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तर १७ जणांना अटक केली आहे. हाच मुद्दा पकडत काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रावर हल्ला चढवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात करोना लसींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टरमुळे राजकारण तापलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading