Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहर कॉँग्रेसच्यावतीने खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण

पुणे – अखिल भारतीय कॉंगेस कमिटीचे महासचिव, खासदार राजीव सातव यांचे वयाच्या ४५ वर्षी अल्पश: आजाराने आज पुण्यात निधन झाले. जहांगिर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ”राजीव सातव यांनी अतिशय अल्प वयात पचांयत समिती ते राष्ट्रीय राजकारणाचे शिखर गाठले. ते महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. २०१० ते २०१४ ते अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. सन २०१४ साली ते हिंगोली मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर २०१९ ला राज्यसभेवर त्यांची निवड झाली. ते गुजरात प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी होते. एक अभ्यासू आणि उत्तम संसद म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षात कधी न भरणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. ते गांधी कुटूंबियांचे निकटवर्तीय होते आणि अनेक विषयांवर राहुलजी गांधी त्यांचा सल्ला घ्यायचे. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि र्इश्वर चरणी प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading