Tuesday, June 16, 2026
Business

हिंदुजा फाउंडेशनचे चोप्रा फाउंडेशनशी सहकार्य, कोविड- 19 महामारीदरम्यान एकत्रितपणे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता करणार

मुंबई  – हिंदुजा फाउंडेशन या शतकभर जुन्या हिंदुजा समूहाची समाजसेवी कंपनी मानसिक आरोग्य व स्वास्थ्य क्षेत्रात प्रवेश करत आहे. फाउंडेशन चोप्रा फाउंडेशनजॉन डब्ल्यू ब्रिक मेंटल हेल्थ फाउंडेशन आणि सीजी क्रिएटिव्ह्ज यांच्या सहकार्याने स्पॉटलाइट इंडिया या तीन तासांच्या कार्यक्रमाचे सह- प्रायोजन करत आहे. हा कार्यक्रम नेव्हर अलोन ग्लोबल मेंटल हेल्थ (व्हर्च्युअल) समिटचा भाग आहे. या कार्यक्रमाची आखणी सत्या हिंदुजाच्या अल्केमिक सॉनिक एनव्हॉरमेंटतर्फे करण्यात आली असून त्याद्वारे चिंतनआकलन आणि देवाणघेवाणीची भावना जागृत करण्यासाठी मल्टीसेन्सरीखोलवर ऐकण्याचा अनुभव तयार करण्यात आला आहे. स्पॉटलाइटमधे सहभागी होणाऱ्या काही प्रसिद्ध वक्त्यांमधे सद्धगुरु आणि अभय देओल यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

 हे व्हर्च्युअल समिट फेसबुक, युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शुक्रवार 21 मे रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता लाइव्ह प्रसारित केले जाणार आहे. सहभागींना https://neveralonesummit.live/. द्वारे त्यांचे मानसिक आरोग्य व स्वास्थ्य जपण्यासाठी मोफत ऑनलाइन साधने मिळवता येतील.

आपल्या देशाचे स्वरुप गुंतागुंतीचे आणि भव्य असल्यामुळे समिटमधील या कार्यक्रमात भारताच्या खोलवर रूजलेल्या एकीचे विश्लेषण सखोल आकलनातून मांडले जाईल. यामधे मेंदूच्या विकासाचे नैसर्गिक चक्र आणि लहानपणापासून प्रौढ वयापर्यंतच्या मानवी अनुभवाचे वैविध्य तसेच त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम दर्शवला जाईल. मानसिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीचे व्यावसायिक, स्वास्थ्य तज्ज्ञ, मेंदूचे शास्त्रज्ञ, कलाकार आणि संगीतकार मानसिक आरोग्याविषयी विचार, उपाय आणि मानसिक व भावनिक लवचिकतेसाठी उपयुक्त साधने भारताला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण जगासमोर मांडली जातील. सध्याच्या कठीण काळात इतरांना उमेद, प्रेरणा, सामाजिक भावना देऊन त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न करण्याची महत्त्वाकांक्षा आम्ही ठेवली आहे.

हा एकत्रित प्लॅटफॉर्म आमची सामायिक मानवता, आपण शिकलेले धडे इतरांबरोबर वाटण्यासाठी आणि समग्र व निरोगी वसुंधरा उभारण्यासाठी भेटण्याचे ठिकाण असेल. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या 136.10 Hz या फ्रीक्वेन्सीला ट्यून होत बहुतेक सहभागी त्यांच्या परंपरा, प्रार्थना आणि सर्जनशील भावना व्यक्त करतील आणि त्यांचा एकत्रित ध्वनी संपूर्ण समिटसाठी एकत्रित अनुनाद निर्माण करेल.

चोप्रा फाउंडेशनच्या पहिल्या नेव्हर अलोन समिटमधे व्यक्तीगत मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तज्ज्ञांचा सल्ला, थेट संभाषण आणि प्रेरणादायी वक्त्यांच्या वैयक्तिक कहाण्या यांसह चित्तवृत्ती उल्हसित करणे, विचारांमधे समतोल आणणे आणि सध्याच्या आव्हानात्मक काळात लवचिकता निर्माण करणे ही उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

हिंदुजा समूहाचे सह- अध्यक्ष आणि विश्वस्त  गोपीचंद पी. हिंदुजा म्हणाले, ‘मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या मूक असतात आणि महामारीच्या काळात तर त्यांची दखलच घेतली जात नाहीये. खोट्या समजुतींपायी त्यांचे गांभीर्य बहुतेकवेळस दुर्लक्षिले जाते. आणि त्यातून समस्या टाळणे वाढणे व पर्यायाने कालांतराने वैद्यकीय मदतीची गरज भासायला लागते. भारतासारख्या काही समाजांमधे या समस्या लांछनास्पद समजल्या जात असल्यामुळे मदत मागणे आणखीनच अवघड आणि आव्हानात्मक होते. माझ्या मते पीडीत व्यक्तीला आपला स्वाभिमान, श्रद्धा पूर्ववत करून आपण एकटे नाही हे लक्षात घेण्यासाठी थेरपीपासून अध्यात्मापर्यंत सर्व प्रकारच्या मदतीची गरज असते. या समिटमधे अशा प्रकारच्या सर्व शक्यता उंचावण्यासाठी संपूर्ण एकत्रीकरण करण्यात आले आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading