बच्चेकंपनीसाठी झी टॉकीजवर खास चित्रपट महोत्सव

झी टॉकीज नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार चित्रपट, मोनोरंजक कार्यक्रम सादर करत ही वाहिनी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे त्यामुळे झी टॉकीज ही सर्व वयोगटातील   प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.झी टॉकीज आपल्या लहानग्या प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येणार आहे. या आठवड्यात झी टॉकीज बच्चे कंपनीसाठी काही खास चित्रपट सादर करणार आहे. दररोज दुपारी ११ वाजता बालमित्रांना  आवडत्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळेल. सोमवार ३ मे रोजी धमाल सुपरहिट चित्रपट ‘चिंटू २’ तर मंगळवार ४ मे रोजी ‘ताऱ्यांचे बेट’ हे चित्रपट बच्चे-कंपनीच्या भेटीस येतील. बुधवार ५ मे रोजी ‘चॅम्पियन्स’, तर ६ मे रोजी ‘नाळ’ हे चित्रपट प्रसारित होतील. या विशेष फिल्म फेस्टिवलचा शेवट ६ मे रोजी ‘एलिझाबेथ एकादशी’ या सुपरहिट चित्रपटाने होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: