रक्तदानासाठी सर्वांनी सहभाग नोंदविणे अपेक्षित – चंद्रकांत पाटील
पुणे : कोरोनाच्या सद्य परिस्थितीमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असताना रक्तदानासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजयुमोचे उपाध्यक्ष महेश पवळे यांच्या वतीने कर्वेनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील व रा. स्व. संघाचे महेशजी करपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, भाजायुमोचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, नगरसेवक सुशील मेंगडे, उद्योजक समीर पाटील, संतोष लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे कार्य करणारे स्वरूपवर्धीनीचे विजय कुर्ले, अविनाश धायरकर, मिहिर पळणीटकर यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपा व संघाच्या आवाहनास प्रत्येकाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग नोंदवत आहेत.
या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ११६ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरास भारती हॉस्पिटल रक्तपेढीने रक्त संकलन केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे भाजयुमोचे उपाध्यक्ष महेश पवळे यांनी आभार मानले.
