काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरवे यांचे निधन

पुणे, दि. 3 – काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरवे यांचे आज अल्पश: अजाराने दुख:द निधन झाले. बाळासाहेब थोरवे हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे २ वेळा अध्यक्ष होते. तसेच क्लब ऑफ महारष्ट्राचे अध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्याबरोबर १९८५ साली त्यांनी NSUI चे अध्यक्ष पदही भुषविले होते.

 पुणे महानगरपालिकेत त्यांनी ७ वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते. बाळासाहेब थोरवे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सामाजिक जाण असलेले व पक्षावर निष्ठा ठेवणारे असे व्‍यक्तिमत्व बाळासाहेब थोरवे यांचे होते. पक्ष संघटनेच्या कामात ते हिरीरीने काम करायचे.

 त्यांच्या निधनाने शहर काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमविला आहे. असे वक्तव्य शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहताना केले.

Leave a Reply

%d bloggers like this: