ग्लेनमार्क तर्फे भारतात रियालट्रिस -ए झेड वाजवी किमतीला सादर  

मुंबई, दि. 3 संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ने आज रियालट्रिस – ए झेड नेझल स्प्रे या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस(नाकाच्या अंतर्भागाचा दाह) वरील उपचारासाठीच्या नेझल स्प्रे (नाकात फवारण्याचे औषध) च्या भारतातील पदार्पणाची घोषणा केली. श्वसन व्याधींवरील औषधे निर्मिण्यात एक प्रमुख कंपनी असलेल्या ग्लेनमार्क ने ऍलर्जिक -हिनटायटिस वर इलाज करणारे हे ब्रँडेड जनरिक औषध भारतात प्रथम आणि किफायतशीर किमतीत आणण्याचा मान मिळविला आहे. या व्याधीचा त्रास असलेल्या व्यक्तींना आता एक सोयीस्कर आणि वाजवी किमतीत उपलब्ध असलेला पर्याय मिळाला आहे.
रियालट्रिस – ए झेड पूर्वनिश्चित मात्रेत औषध (मोमेटासोन ५० एमसीजी आणि अझेलास्टिन १४० एमसीजी ) म्हणून बाजारात आणणारी ग्लेनमार्क ही जगातील पहिली कंपनी आहे
एका पाहणीनुसार भारतातील मधील २० ते ३० टक्के लोकांमध्ये ऍलर्जिक -हिनटायटिस चा त्रास होतो. भारतात रुग्णांना औषधे स्वतःच विकत घ्यावी लागतात आणि हा उपचार नियमितपणे घेण्यातला एक मोठा अडसर ठरू शकतो. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या अशाच प्रकारच्या औषधाच्या १० प्रमुख ब्रँडची किंमत सरासरी ३६५ रुपये आहे. मात्र ग्लेनमार्कच्या रियालट्रिस – ए झेड नेझल स्प्रे च्या ७५ डोस पॅक ची किंमत फक्त १७५ रुपये , म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या अशाच प्रकारच्या औषधाच्या इतर १० प्रमुख ब्रँड्स च्या तुलनेत ५२ टक्के कमी आहे.

ग्लेनमार्क ने विकसित केलेले रियालट्रिसए झेड नेझल स्प्रे हे नवे पूर्वनिश्चित प्रमाणात देण्याचे औषध नाकात फवारण्याच्या स्वरूपात दिले जाते. ऍलर्जिक -हिनटायटिस ची समस्या असलेल्या १२ वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तीना हे औषध देता येईल. हा स्प्रे नाक चोंदणे. नाक वाहणे, नाकात खाज येणे, वारंवार शिंका येणे किंवा डोळे चुरचुरणे, लाल होणे अथवा डोळ्यातून पाणी वाहणे या ऍलर्जिक -हिनटायटिस च्या मुख्य समस्यांपासून आराम देतो

ग्लेनमार्क चे ग्रुप व्हाइस प्रेसिडेंट आणि औषध व्यवसायाचे प्रमुख आलोक मलिक म्हणाले, भारतात श्वसन दोषांनी त्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी औषधे उपलब्ध करणारी ग्लेनमार्क ही अग्रेसर कंपनी आहे. रियालट्रिसए झेड हे उत्पादन सादर करताना आम्हाला विशेष समाधान आहे . या अत्याधुनिक औषधाने सर्व चाचण्या पार केल्याआहेत आणि देशातील रुग्णांसाठी ते परवडणा-या किमतीला उपलब्ध आहे. श्वसनादोषांवरील औषधांची निर्मिती हा ग्लेनमार्क च्या व्यवसायाचा एक प्रमुख भाग आहे आणि हे औषध भारतात ऍलर्जिक -हिनटायटिस ची समस्या असलेल्याना सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असलेला प्रभावी पर्याय ठरणार आहे.
ऍलर्जिक -हिनटायटिस हा श्वसनसंस्थेच्या वरच्या टप्प्यात आढळणा-या रोगांपैकी एक आहे. जगातील १० ते ४० टक्के लोकांना त्याचा त्रास होतो आणि त्यांना कामाचा वेळ वाया जाणे, झोप न लागणे आणि घराबाहेर पडता न येणे अशा समस्याच निर्माण होतात. रियालट्रिसए झेड थेट नाकात सोडले जात असल्यामुळे तोंडावाटे घेण्याच्या औषधांपेक्षा त्याचा परिणाम लवकर होतो आणि साइड इफेक्टस टळतात.
कॉर्टिकोस्टेरॉइड ( आयएनसीएस ) आणि अँटिहिस्टॅमिन (आयएनएएच ) यांच्या एकत्रित उपचारामुळे इतर उपचारांच्या मानाने रुग्णाला त्वरित आराम मिळतो. ऍलर्जिकहिनटायटिस आणि त्यामुळे दम्यावर होणारा परिणाम याविषयीची नवी मार्गदर्शक तत्वे नाकात फवारण्याचे कॉर्टिकोस्टेरॉइड (आयएनसीएस ) आणि अँटिहिस्टॅमिन (आयएनएएच ) यांची मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस वरील पहिला इलाज म्हणून शिफारस करतात. तंत्रज्ञानाचा लाभ आणि वाजवी किंमत याचा फायदा ग्लेनमार्क मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस ची समस्या असलेल्या भारतातील रुग्णांपर्यंत रियालट्रिसए झेड द्वारे पोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: